वर्धा: वृत्तसंस्था । जिल्ह्यातील भुगाव येथील उत्तम गालवा कंपनीत झालेल्या स्फोटात ३८ मजूर भाजले यापैकी १० मजूर गंभीर असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. गंभीर भाजलेल्या मजुरांना नागपूरला पाठवलं जाणार आहे.
कंपनी प्रशासनाच्या मतानूसार कंपनीत विस्फोट झाला नसून हा अपघात आहे. या घटनेची कामगार अधिकाऱ्यांमार्फत चौकशी होणार आहे.गुन्हा दाखल करण्यासाठी प्रशासनाकडून टाळाटाळ करण्यात येत असल्याचं दिसून येत आहे.
भुगाव येथील उत्तम गालवा मेंटालीक स्टील या कंपनीत ब्लास फर्निश या युनिटमध्ये सकाळच्या सुमारास अपघात घडलाय. जखमींना सावंगी आणि सेवाग्राम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.गंभीर घटना घडूनही अद्यापपर्यंत कोणताही गुन्हा दाखल करण्यात आला नाही.
आज सकाळी पाचच्या दरम्यान दुरुस्ती करण्याकरता प्लांट बंद करण्यात आला होता.आठ वाजता या ठिकाणी काम चालू करण्यात आले.ट्यु एयरमधून गरम हवा आणि बारीक कण उडाले यामुळे मजूर भाजले गेले आहेत.
जिल्ह्याचे महसूल प्रशासन, जिल्हा प्रशासन आणि पोलीस प्रशासन घटनास्थळी दाखल झालं असून त्यांच्याकडून पंचनामा केला गेला आहे.
.सावंगी पोलिसांनी पंचनामा केलाय. मात्र, गुन्हा दाखल करण्यासाठी प्रशासनाकडून टाळाटाळ केली जात आहे.