जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | कंडारी येथील परेश रिसॉर्ट मधून १ लाख २५ हजार रूपये किंमतीचे हॉटेल चालविण्याचे साहित्य न सांगता चौघांनी नेल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव तालुक्यातील कंडारी शिवारात परेश रिसार्ट नावाचे हॉटेल आहे. तिथे अशोक पंडीत पाटील रा. कंडारी ता.जि.जळगाव हे नोकरीला आहे. हॉटेलमध्ये हॉटेल चालविण्याचे साहित्य यात बेड, ग्लास सेट, डबल बेड, बाथ टॉवेल, किचन सेट, प्लेट आदी साहित्या असा एकुण १ लाख २५ रूपये किंमतीचे साहित्य हर्षल पवार, जिवानी हर्षल पवार, विजय पाटील, योगेश पाटील सर्व रा. कंडारी ता.जि.जळगाव यांनी मालकाला काहीही न सांगता ३१ मे २०२२ रोजी घेवून गेले होते.
दरम्यान मालकाला पुर्व कल्पना न देता परस्पर १ लाख २५ हजाराचे साहित्य नेल्याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली. त्यानुसार तब्बल दोन महिन्यानंतर मंगळवारी २६ जुलै रेाजी रात्री एमआयडीसी पोलीस ठाण्यात हर्षल पवार, जिवानी हर्षल पवार, विजय पाटील, योगेश पाटील सर्व रा. कंडारी ता.जि.जळगाव यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार संजय जाधव करीत आहे.