मुंबई : वृत्तसंस्था । कोरोनाचं संकट अद्याप टळलं नसल्यानं राज्य सरकारनं कंटेनमेंट झोनमधील लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.
महाराष्ट्रातील कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेता लॉकडाऊन वाढवल्याची घोषणा करण्यात आली आहे. यानुसार राज्यातील कंटेनमेंट झोनमध्ये येत्या २८ फेब्रुवारी पर्यंत निर्बंध कायम ठेवण्यात येणार आहे. लॉकडाऊन वाढवताना राज्य सरकारनं यापूर्वी वेळोवेळी जारी केलेले आदेश लागू असतील. .
सार्वजनिक ठिकाणी मास्क बंधनकारक , सामाजिक अंतर राखणं गरजेचं , सतत हात धुणे आवश्यक या सूचना तमाम नागरिकांसाठी बंधनकारक असतील
ब्रिटनमध्ये कोरोना विषाणूची नवी प्रजाती समोर आली होती. जगभरातील सर्वच देशात कोरोनाच्या नव्या स्ट्रेन सापडल्यानंतर भारतातही अनेक ठिकाणी नव्या कोरोना विषाणूंचे रुग्ण आढळले होते. त्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारने ३१ जानेवारी पर्यंत लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय घेतला होता.
देशातील कोणत्याही राज्यात लॉकडाऊन लागू करायचा असेल, तर आता त्यासाठी केंद्र सरकारची परवानगी आवश्यक असणार अशी सूचना केंद्रीय गृहमंत्रालयाकडून देण्यात आली होती. केंद्राकडून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नव्या मार्गदर्शक सूचना जाहीर करण्यात आल्या. त्यानुसार आता कंटेन्मेंट झोन वगळता इतर भागांमध्ये लॉकडाऊन करण्यासाठी राज्यांना केंद्र सरकारची परवानगी घ्यावी लागणार आहे. कंटेन्मेंट झोनमध्ये केवळ अत्यावश्यक सेवांना परवानगी द्यावी. तसेच कंटेन्मेंट झोन मार्किंग करण्यात यावे, असे केंद्रीय गृहमंत्रालयाने म्हटले.