जळगाव, प्रतिनिधी | आपल्याला १९४७ साली मिळालेले स्वातंत्र्य ही तर भीक असून खरे स्वातंत्र्य २०१४ ला मिळाले, असे वक्तव्य करणाऱ्या अभिनेत्री कंगना राणावत हिच्या विरोधात शहर पोलीस स्टेशन येथे राष्ट्रवादीतर्फे तक्रार दाखल करण्यात येवून पद्मश्री परत करावा अशी मागणी करण्यात आली आहे.
कंगनाचे वक्तव्य देशविरोधी आणि स्वातंत्र्यसैनिकांचा अपमान करणाऱे असल्याने तिच्याविरोधात तातडीने गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी पोलिसांना दिलेल्या तक्रारीत करण्यात आली आहे. याप्रसंगी महानगराध्यक्ष अशोक लाडवंजारी, महिला शहराध्यक्ष मंगला पाटील, प्रतिभा शिरसाट, युवती जिल्हाध्यक्ष कल्पिता पाटील, अमोल कोल्हे, जिल्हा सरचिटणीस अशोक पाटील, सुशील शिंदे, राजू मोरे, सुहास चौधरी, रुपाली पाटील, रा.यु. कॉ. जिल्हा कार्याध्यक्ष कोमल पाटील, रा.यु. कॉ. उत्तर महाराष्ट्र समन्वयक दिव्या भोसले, किरण राजपूत, पुरुषोत्तम चौधरी आदी उपस्थित होते.
https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/476295947071781