औरंगाबादेत शिवजयंतीच्या मिरवणुकीत तरूणाचा खून

औरंगाबाद (वृत्तसंस्था) शिवजयंतीच्या मिरवणूकीत घुसून एका तरूणाची औरंगाबादमध्ये हत्या करण्यात आल्याचा प्रकार उघड झाला आहे. श्रीकांत गोपीचंद शिंदे ( वय २o, रा. गारखेडा) असे मयत तरूणाचे नाव आहे. दरम्यान, या घटनेमुळे प्रचंड खळबळ उडालेली आहे.

 

श्रीकांत गोपीचंद शिंदेचे हा महाविद्यालयात कला शाखेत शेवटच्या वर्षाला आहे. बुधवारी, १९ फेब्रुवारी रोजी मित्रांसोबत तो हनुमाननगरकडून पुंडलिकनगर छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याकडे जाणाऱ्या मिरवणूकीत सहभागी झाला होता. दरम्यान, मिरवणुकीत सहभागी होण्यापूर्वी श्रीकांतचे काही अनोळखी तरूणांसोबत जोरदार भांडण झाले होते. भांडणानंतर श्रीकांत मिरवणूकीत सहभागी झाला. डीजेच्या तालावर इतर तरूणांसोबत श्रीकांत नाचत असतांना त्याचवेळी आरोपीने चाकू श्रीकांतच्या छातीत खुपसत तात्काळ घटनास्थळावरून पळ काढला. अचानक झालेल्या हल्ल्यामुळे श्रीकांत जमीनीवर कोसळला. मृत श्रीकांतचा भाऊ सूरज शिंदे याच्या फिर्यादीवरून पुंडलिकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Protected Content