औरंगाबादला संभाजीनगर करण्यासाठी मी स्वतः तुम्हाला साथ देईल : इम्तियाज जलील

imtiyaj jalil

औरंगाबाद (वृत्तसंस्था) संभाजी महाराज मोठे महापुरुष होते. आधी पुढील ४ वर्षात शहराचा विकास करा, मग नाव बदलायचा मुद्दा घ्या. त्यावेळी आम्ही तुम्हाला साथ देऊ, अशी भूमिका एआयएमआयएमचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार इम्तियाज जलील यांनी औरंगाबादच्या नामांतराबाबत मांडली आहे. एवढेच नव्हे तर, महानगर पालिकेची निवडणूक येत असल्यामुळे नामांतराची पुन्हा मागणी होणार हे २०० टक्के माहिती असेही त्यांनी म्हटले आहे.

 

इम्तियाज जलील म्हणाले, मी 32 वर्षांपासून ऐकत आहे की औरंगाबादचं नाव संभाजीनगर होणार आहे. निवडणुका जवळ आल्यावर तसे हा मुद्दा उपस्थित केला जातो. महानगर पालिकेची निवडणूक जवळ असल्यामुळे नामांतराची पुन्हा मागणी होणार हे २०० टक्के माहिती होते. परंतु शहरासमोर कचरा, शिक्षण, आरोग्य हे मुद्दे आहेत, पण यावर तुम्ही बोलणार नाही. ज्यांना काही कामी उरली नाहीत तेच असे मुद्दे उपस्थित करतात, असेही म्हणत इम्तियाज जलील यांनी शिवसेनेवर निशाणा साधला. तसेच नामातारांच्या निमित्ताने समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न सुरु असून बाळासाहेब ठाकरे असते, तर ते माझ्या नावाने स्मारक बांधू नका, तर मोठे हॉस्पिटल बांधा, असे म्हणाले असते, असेही इम्तियाज जलील म्हटले.

Protected Content