Home आरोग्य औरंगाबादमध्ये गेल्या २४ तासात ७ नव्या कोरोना रुग्णांची वाढ !

औरंगाबादमध्ये गेल्या २४ तासात ७ नव्या कोरोना रुग्णांची वाढ !


औरंगाबाद (वृत्तसंस्था) औरंगाबादमध्ये गेल्या २४ तासात ७ नव्या कोरोना रुग्णांची वाढ झाली आहे. या सर्वांवर औरंगाबादेतील मिनी घाटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

 

औरंगाबादमध्ये आतापर्यंत सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्णांची संख्या २४ तासात झाली आहे. यात एकाच कुटुंबातील तीन महिलांचा समावेश आहे. या तिन्ही महिलांवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. औरंगाबादमध्ये आतापर्यंत ४७ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. या सर्वांवर औरंगाबादेतील रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे. तर दुसरीकडे औरंगबादेतील ६ पॉझिटिव्ह रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.


Protected Content

Play sound