ओरिऑन स्कूलमध्ये विद्यार्थ्यांचे स्वागत

 

जळगाव प्रतिनिधी ।  के.सी.ई.सोसायटी संचालित ऑरिऑन स्टेट बोर्ड स्कूल आज दि.8 रोजी सुरु झाली. शाळेमध्ये सर्व प्रथम वर्ग खोल्याना निरजंतुकीकरण करण्यात आले.

सकाळी ७ वाजता  विद्यार्थ्यांची सुरुवात झाली. सर्व प्रथम विद्यार्थी व विद्यार्थिनींचे प्राचार्य संदीप साठे व शिक्षकानी स्वागत केले. यावेळी शाळेचे समन्वयक  चंद्रकांत भंडारी उपस्थित होते. विद्यार्थी शाळेत दाखल होताच त्यांचे तापमान मोजन्यात आले, सैनिटाइजरचा वापर करुन सैनिटाइज करण्यात आले. त्याच प्रमाणे त्यांची ऑक्सीजन मर्यादा तपासन्यात आली. सोशल डिस्टन्सिंग पाळन्यात आले त्यानंतर विद्यार्थी वर्गात गेले. आज पहिला दिवस असल्या कारणाने विद्यार्थ्यांची उपस्थिति कमी होती.  सकाळी ७ ते १०.३० पर्यन्त विद्यार्थ्यांना वर्गात  ऑनलाइन व  ऑफ लाइन शिकवण्यात आले.

Protected Content