भुसावळ प्रतिनिधी | येथील ओम सिद्धगुरु नित्यानंद प्रतिष्ठान आणि गणेश कॉलोनी मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने गणेश कॉलोनी, रिंग रोड याठिकाणी कॉविशिल्ड लसीकरण शिबिराचे आयोजन करण्यात आले.
शहरात वॉर्ड स्तरावर पहिल्यांदाच ओम सिद्धगुरु नित्यानंद प्रतिष्ठान आणि गणेश कॉलोनी मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने लसीकरणाचे आयोजन करण्यात आले. याचा यावेळी प्रभागातील नागरिकांनी लाभ घेतला.
यावेळी सतिश सपकाळे,विशाल जंगले, प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. नि. तु. पाटील, संदीप सुरवाडे, संतोष बारसे, हर्षल पाटील, भागवत पाटील, सागर वाघोदे, दिलीप बेंडाळे,नाना बर्हाटे,विलास पाटील,ललित नेहेते,डॉ.नीलकंठ फेगडे,अमित असोदेकर, भाग्येश चौधरी,रुपेश महाजन,विजय ससाणे,महेंद्र बोंडे यांनी उपक्रम यशस्वी साठी प्रयत्न घेतले. कुणाल जगताप,उषा गायकवाड, कोमल तायडे,तसेच सर्व गणेश कॉलोनी मित्र मंडळ यांचे सहकार्य लाभले
या लसीकरण शिबिराचा ११५ जणांनी लाभ घेतला.