पाचोरा, प्रतिनिधी | गोपीनाथ मुंडे आणि छगन भुजबळ यांची जोडीची ओबीसी लढा पुनरावृत्ती महाराष्ट्रात होणार आहे.ओबीसीसाठी माजी मंत्री एकनाथराव खडसे आणि छगन भुजबळ यांची जोडी आगामी काळात ओबीसी लढा देणार. छगन भुजबळ यांना गोपीनाथ मुंडे यांच्या जागेवर ओबीसी लढा देण्यासाठी नाथाभाऊ खडसे यांच्या रूपाने एक भाऊ मिळाला आहे. वंचित घटकांना न्याय देण्यासाठी आतापर्यंत विधानसभेत गरजलेला महाराष्ट्रच्या राजकारणात अभ्यासू व मुरलेला नेता म्हणजे एकनाथराव खडसे असल्याचे मत माळी समाज महामंडळाचे अध्यक्ष माळी समाजाचे राज्याचे नेते अनिल महाजन यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारा मांडलं आहे.
एकनाथ खडसे म्हणजे राजकारणात असलेले एक वटवृक्ष आहे. या वटवृक्षाची सावली अनेकांनी आतापर्यंत घेतली आहे. राज्यात भाजपाला चांगले दिवस जे आज बघायला मिळालेत ते फक्त आणि फक्त एकनाथ खडसे यांच्या मुळे आहेत. ही गोष्ट कोणीही नाकारू शकत नाही. नुकताच उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा जळगाव जिल्हा दौरा झाला अतिशय चांगला प्रतिसाद अजित पवार यांच्या दौऱ्याला मिळाला या दौऱ्या दरम्यान आगामी काळात जळगाव जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मजबूत होणार आहे आणि जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका, बाजार समित्या या सर्व ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वर्चस्व राहणार आहे आणि खानदेशातील सर्व निवडणुका एकनाथ खडसे यांच्या नेतृत्वात लढविल्या जातील व एकनाथ खडसे यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पुढील वाटचाल असणार आहे. खानदेश पट्ट्यात असे अधिकृत पणे अजित पवार यांनी जाहीर केले व संकेत दिले आहे. नुकतीच जळगाव जिल्हा बॅंक एकतर्फी राष्ट्रवादी कडे आणून दाखविले जिल्ह्याच्या राजकारणात पक्षात अनेक लोकप्रतिनिधीचे प्रवेश सुरू आहेत. नगरसेवक असतील, समाजातील प्रतिष्ठित व्यक्ती असतील हे सर्व लोक एकनाथ खडसे यांच्या विश्वावासावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करत आहे. एकनाथ खडसे यांच्यासह यांच्या कुटूंबाला भाजपा पक्षाने किती त्रास दिला अजूनही देत आहे. एक चांगला नेता घडायला अनेक वर्षे लागत असतात आपल्यावर केलेले उपकाराची भाजप नेत्यानी थोडीही जाणीव केली नाही याची खंत नाथाभाऊ यांना आहे.
पण एकनाथ खडसे हे डगमगणारे व्यक्ती नाहीत. देशाचे नेते फुले, शाहू, आंबेडकर, विचारसरणीचे शरद पवार यांचा आशीर्वाद घेऊन व उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पूर्ण सहकार्य घेऊन ओ.बी.सी. नेते छगन भुजबळ यांच्या खांद्याला खांदा लावून बहुजनांचा लढा देण्यासाठी ओबीसीचे रद्द केलेली राजकीय आरक्षण मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील असणार आहेत व आगामी काळात राजकारणात मोठी उलथापालथ एकनाथराव खडसे हे राज्यात करतील असे संकेत आहेत.
समाजातील प्रत्येक घटकाला नाथाभाऊ न्याय देतात. त्यामुळे नवयुवक तरुण पिढी व जळगाव जिल्ह्यातील अनेक जेष्ठ समाज बांधव यांना नाथाभाऊ यांच्यावर पूर्ण विश्वास आहे. कारण नाथाभाऊ खडसे दूरदृष्टी आणि विकासपुरुष नेता आहे. यामुळेच जळगाव जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला त्यांच्या रुपाने एक संजीवनी मिळाली आहे.