चाळीसगाव प्रतिनिधी । कोरोनाच्या लॉकडाऊननंतर बस व्यवस्थापन ठप्प झाली होती. ती पुन्हा सुरळी व्हावी आणि विद्यार्थ्यांची गैरसोय टाळण्यासाठीचे मागणीचे निवेदन ग्लोबल बंजारा फाऊंडेशनतर्फे चाळीसगाव आगारप्रमुख संदीप निकम यांना देण्यात आले आहे.
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, तालुक्यातील ओढरे गावात टाळेबंदी लागू झाल्यापासून बस व्यवस्था ह्या ठप्प करण्यात आले आहे. शाळा व महाविद्यालयांना ही शासनाने परवानगी दिल्याने बसच्या अभावामुळे विद्यार्थ्यांची गैरसोय होत आहे. ही गैरसोय दूर व्हावी व बस सुरळीत सुरू करावी. यासाठी ग्लोबल बंजारा फाऊंडेशनचे संस्थापक अशोक राठोड व निवृत्त आगार व्यवस्थापक भास्कर चव्हाण यांनी निवेदन परिवहन आगार प्रमुख संदीप निकम यांना दिले. लवकरच आपण बस सुरू करणार असल्याचे निकम यांनी यावेळी कळविले. ओढरे गावात गाड्यांची वेळ अनुक्रमे पुढील प्रमाणे आहेत. वेळ सकाळी ६, ८ , १० तर दुपारी १ व ३ तसेच सायंकाळी ६ ते रात्री ८:०० ह्या वेळेत गाड्या नेहमीत यावी अशी मागणी ही यावेळी करण्यात आली.
यानिवेदनावर पंडीत चव्हाण, सुरेश चव्हाण, मच्छिंद्र पाटील, गजानन चव्हाण, ठाकूर राठोड, विकास राठोड, दिनेश राठोड, विद्या चव्हाण, राज चव्हाण, गबरू पवार, कार्तिक चव्हाण, रविंद्र चव्हाण, प्रविण चव्हाण, सुनिल मोरे, कृष्णा पवार, संभाजी चव्हाण, निलेश राठोड, शांताराम चव्हाण, मनोज चव्हाण, संकेत पवार, अनिल चव्हाण, राहूल राठोड, अनिकेत राठोड, मनोज राठोड, निवृत्ती जाधव, सचिन चव्हाण, धर्मराज पवार, सोपान पवार, पवन चव्हाण, अरविंद चव्हाण, नरेश राठोड व राकेश गवळी आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.