जळगाव प्रतिनिधी । केसीई सोसायटीच्या गुरुवर्य प पाटील प्राथमिक विद्यामंदिर व ए.टी. झांबरे माध्यमिक विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने नेताजी सुभाष चंद्र बोस यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
सर्वप्रथम शाळेच्या मुख्याध्यापिका रेखा पाटील यांच्या हस्ते नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. शास्वत कुलकर्णी, चैतन्य बडगुजर, पवन शिंपी या विद्यार्थ्यांनी नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्या जीवन कार्याविषयी माहिती त्यांच्या भाषणातून दिली तर इयत्ता पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांनी आपल्या ऑनलाइन स्टेशनच्या माध्यमातून भाषणे केली. त्यानंतर उपशिक्षक अतुल पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रोहिणी पाटील यांनी केले तर आभार प्रदर्शन पराग राणे यांनी मांडले. प्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक दिलीप कुमार चौधरी, पर्यवेक्षिका प्रणिता झांबरे तसेच सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.