जळगाव प्रतिनिधी । एस.टी. महामंडळ कागदपत्र तपासणी समितीला अधिकार नसतांना अनुसुचित जमातील (टोकरे कोळी) यांना अपात्र ठरविला. याच्या निषेधार्थ आज नवीन बसस्थानकासमोर मानवी अन्याय निवारण केंद्रच्या वतीने लाक्षणिक उपोषण करण्यात आले.
उपोषणार्थी उमाकांत वाणी आणि वसंत कोळी यांनी दिलेल्या माहितीनुसार, एस.टी.महामंडळाने टंकलिपीकासाठी भरती काढण्यात आली होती. यासाठी पंकज वसंत कोळी या तरूणाने २०१६-१७ मध्ये प्राथमिक परिक्षा पास केली होती. मुलाखतीनंतर डिसेंबर २०१८ मध्ये कागदपत्र तपासणीसाठी बोलावले होते. तरूणाकडे टोकरे कोळी जातीचा दाखला जळगाव तहसील कार्यालयातून केंद्राचा दाखला होता. कागदपत्र पुर्ण असतांना एस.टी. महामंडळ कागदपत्र तपासणी समितीला अधिकार नसतांना पंकज कोळी या तरूणाचा दाखल नाकारून पदासाठी अपात्र ठरविले. दरम्यान, महामंडळाला हा अधिकार नसतांना तरूणाला अपात्र ठरविल्याच्या विरोधात आज नवीन बसस्थानकासमोर पंकज कोळी यांचे वडील वसंत कोळी आणि उमकांत वाणी यांनी मानवी अन्याय निवारण केंद्राच्या वतीने लाक्षणिक उपोषणाला बसले आहे. पदासाठी अपात्र ठरविलेल्या पंकज कोळी याला पत्र करून नोकरीत समाविष्ठ करावे आणि संबंधित अधिकाऱ्यावर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे.
उपोषणार्थी उमाकांत वाणी आणि वसंत कोळी यांनी यांनी दिलेली प्रतिक्रिया..
https://www.facebook.com/508992935887325/videos/1046565425843548