मुंबई, लाईव्ह ट्रेंड्स न्युज वृत्तसेवा – एसटी कर्मचाऱ्याच्या संप सुरु असून विलीनीकरण संदर्भात आज न्यायालयात दुपारी सुनावणी होती. हि सुनावणी आज देखील टळली असून उद्या सकाळी १० वाजेनंतर विलीनीकरण मुद्द्यावर सुनावणी घेण्यात येणार आहे.
एसटी कर्मचाऱ्याच्या मृत कर्मचाऱ्याचा दुखवटा पाळत विलीनीकरण मागणीसाठी गेल्या ५ महिन्यापासून संप सुरु आहे. मंगळवार ५ एप्रिल रोजी दुपारी उच्च न्यायालयात विलीनीकरण आणि कर्मचाऱ्याच्या संपाबाबत सुनावणी घेण्यात येणार होती. यावेळी दरम्यान, विलीनीकरण संदर्भात राज्य सरकार आपला निर्णय कोर्टात जाहीर करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.