जळगाव : प्रतिनिधी । एस टी महामंडळाच्या आगारांमध्ये खाजगी बसेसना थांबून प्रवासी घेण्याची परवानगी देणे म्हणजे या महामंडळाच्या खाजगीकरणाचा कारस्थान आहे . या धोरणाला विरोध करण्यासाठी आपण काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची भेट घेऊन चर्चा केल्याचे आज जिल्हा जागृत जनमंचचे शिवराम पाटील यांनी पत्रपरिषदेत सांगितले .
यावेळी शिवराम पाटील यांनी सांगितले की , १८ मे रोजी परिवहन महाव्यवस्थापक यांनी राज्यातील विभागिय नियंत्रकांना एसटी डेपोत खाजगी भाड्याच्या गाड्यांसाठी जागा निश्चित करून ४८ तासात अहवाल सादर करण्याचे आदेश दिले. तेच पत्र प्रत्येक डेपो मैनेजरला दिले. यास २२ कामगार संघटनांनी विरोध दर्शविला आहे. याबाबत ४ संघटनांचे आम्हाला पत्र प्राप्त झाले आहे. कांग्रेस प्रणीत इंटक कामगार संघटना चुपके चुपके धोरण अवलंबित असल्याचा आरोप शिवराम पाटील यांनी केला. जळगाव जिल्हा जागृत जनमंच अध्यक्ष शिवराम पाटील, डॉ. सरोज पाटील, नाना पटोले विचारमंच कैलास महाजन यांनी नाना पटोले यांची मुंबईत भेट घेवून भूमिका स्पष्ट केली त्यांनीदेखील खाजगीकरणाला विरोध दर्शवून मुख्यमंत्री व परिवहनमंत्री यांना विरोधातील पत्र लिहीण्याचे आश्वासन दिले. एकूण ५०० खाजगी गाड्या एसटी डेपोत घुसडण्याची योजना असल्याचा आरोप करत या गाड्या केवळ हायवे व फायदेशीर रुटवर चालवल्या जातील अशी शंका शिवराम पाटील यांनी व्यक्त केली. या गाड्यांवर खाजगी चालक असल्याने एस टी महामंडळातील १५,०० चालक बेरोजगार होतील अशी भीती त्यांनी व्यक्त केली. एसटीच्या १७,५०० गाड्या जाणिवपुर्वक नादुरुस्त केल्या जातील. एसटी महामंडळ तोट्यात दाखवून बंद पाडण्यात येईल. एसटी डेपोची शहरातील मध्यवर्ती जागा हडपण्याचा डाव हाणून पाडला पाहिजे. कांग्रेसने अनिल परब यांचा आदेश रद्द करावा अन्यथा परब यांचा राजीनामा घ्यावा. खासगीकरणा संदर्भातील जळगाव जिल्ह्यातील सर्व आमदार व मंत्री गुलाबराव पाटलांनी आपली भुमिका स्पष्ट करावी असे आवाहन शिवराम पाटील यांनी यावेळी केले.
भाग १
https://www.facebook.com/508992935887325/videos/483421146314989
भाग २
https://www.facebook.com/508992935887325/videos/1164011470780354