एरंडोल प्रतिनिधी । सालाबादप्रमाणे श्रीची मोठी गणेश मूर्तीची स्थापन न करता कोरोना महामारीचे संकट लक्षात घेवून चक्क निंब वृक्षावर साकारलेल्या बाप्पाची पूजा करत गांधीपुरा परिसरातील गणेश मंडळाने गणेशोत्सव साजरा केला.
गांधीपूरा परिसरातील गणेश भक्तांनी कोरोना विषाणूचे भय लक्षात घेता व दरवर्षीप्रमाणे मंडळाचा मोठा गणपती न बसवता निंब वृक्षावरील साकारलेले गणपती बाप्पा ची पूजा करत गणेशोत्सव साजरा केला. याप्रसंगी भैया वंजारी, भुषण बडगुजर, राहुल साळी, सागर मराठे, वना गुजर, अतुल मराठे, प्रतिक वंजारी, राहुल वंजारी, शुभम दिवटे, कैलास दिवटे सर्व जय श्रीराम मित्र मंडळाचे कार्यकर्ते उपस्थीत होते.