एरंडोल, प्रतिनिधी | येथील सय्यद वाड्यातील विवाहितेने राहत्या घरात दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज उघडकीला आली आहे. याप्रकरणी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
याबाबत वृत्त असे की, फिरोजा अखिल पिंजारी (वय- ३०) रा. सय्यद वाडा ता. एरंडोल या विवाहितेने राहत्या घराच्या छताला दोरी बांधून गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी ९:३० वाजताच्या सुमारास उघडकीला आली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली व पंचणामे केली. दरम्यान वैद्यकीय अधिकारी यांच्या खबरीवरून एरंडोल पोलीस स्थानकात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव यांच्या निर्देशानुसार पुढील तपास संदीप पाटील व संतोष चौधरी हे करीत आहेत.