एरंडोल प्रतिनिधी । जागतिक योग दिनाच्या निमित्ताने येथील मैत्री सेवा फाऊंडेशनच्या वतीने २१ जून रोजी एरंडोलकरांचे कोरोना संसर्ग रोखण्यासाठी व आरोग्य सुदृढ राहण्यासाठी ‘एक तास आरोग्यासाठी’ उपक्रम राबविण्यात येत आहे.
एरंडोलकरांनी घरी राहून आपल्या परिवारासह योग करतांना एक फोटा किंवा १५ सेकंदाची व्हिडीओ क्लिप बनवून (8208303730, 9673868883) क्रमांकावर पाठविण्याचे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे. दरम्यान सहभागी झालेल्यांना मैत्री सेवा फाऊंडेशनतर्फे प्रमाणपत्र देण्यात येणार असल्याची माहिती कळविले आहे. दिलेल्या क्रमांकावर नाव नोंदणी करणे आवश्यक असून एरंडोलकरांनी २१ जून रोजी सकाळी ६ वाजेपासून योगाला सुरूवात करायची आहे.