एरंडोल प्रतिनिधी । नगराध्यक्षांसह मुख्याधिकाऱ्यांनी शहरात फिरून भाजीपाला विक्रेत्यांच्या बैठक व्यवस्थेचा आढावा घेतला. यावेळी भाजीपाला, फळविक्रेते यांच्याकडून प्रतिसाद मिळाला.
एरंडोल नगरपालिकेचे लोकनियुक्त नगराध्यक्ष रमेशसिंग परदेशी, मुख्याधिकारी किरण देशमुख व कार्यालय अधीक्षक संजय ढमाळ यांनी शहरात फिरून भाजीपाला विक्रेते व फळविक्रेते यांच्या बैठक व्यवस्थेविषयी आढावा घेतला, सर्व विक्रेत्यांनी या योजनेला उत्कृष्ट प्रतिसाद दिला आहे. अशी माहिती नगराध्यक्ष रमेशसिंग परदेशी यांनी सांगितले.
यावेळी मुख्याधिकारी किरण देशमुख व कार्यालय अधीक्षक संजय ढमाळ हे उपस्थित होते. सोशल डिस्टन्सीग चे व्यवस्थित पालन होत असल्याचे यावेळी आढळून आले. दरम्यान न.पा.तर्फे मंगळवारी न.पा. कार्यालय जवळ धरणगाव चौफुलीवर, अमळनेर दरवाजा परिसरात व म्हसावद नाका परिसरात या मोक्याच्या ठिकाणी जनजागृतीपर व सुचना फलक लावले आहेत.
जिल्ह्यातील प्रत्येक बातमी आता आपल्या स्मार्टफोनवर !
वेबसाईट : https://livetrends.news
फेसबुक पेज : https://www.facebook.com/livetrendsnews01
व्हाटसअॅप क्रमांक : ९३७०४०३२००