एरंडोल नपातर्फे प्रभाग क्र. ६ मध्ये स्वच्छता व वृक्ष लागवड मोहीम

एरंडोल प्रतिनिधी |  नगरपालिकेतर्फे  शहरात स्वच्छता व वृक्ष लागवड मोहिमेची सुरुवात नगराध्यक्ष रमेश परदेशी, उपनगराध्यक्षा आरती महाजन, नगरसेवक योगेश महाजन यांच्या हस्ते करण्यात आली.

 

नाग्र्पलीकेतर्फे स्वच्छता व वृक्ष लागवड  मोहीम दि. २९ सप्टेंबरपासून राबविण्यात येत आहे. या मोहिमेत मुख्याधिकारी विकास नवाळे, कार्यालय अधिक्षक हितेश जोगी, आरोग्य निरिक्षक अनिल महाजन, देवेंद्र शिंदे, डॉ. अजित भट, विवेक कोळी, विनोद पाटील, भूषण महाजन, महेंद्र पाटील, डॉ. योगेश सुकटे, शिवशंकर ठाकूर, सौरभ बागड, दिपक गोसावी, विकास पंचबुध्दे, प्रियंका जैन यांच्यासह अधिकारी, कर्मचारी  सहभागी झाले होते.

सध्यस्थितीत पावसाळा सुरु असल्यामुळे एरंडोल शहरात साथीचे रोगाचे प्रमाण वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे त्यावर उपाययोजना म्हणून संपूर्ण शहरातील गटारी, रस्ते, खुल्या जागा इत्यादीची युध्दीपातळीवर प्रत्येक प्रभागानुसार दर बुधवारी सर्व १०  प्रभागाची साफसफाई करण्याची आणि वृक्षारोपणाची मोहिम हाती घेण्यात आलेली आहे.  त्याकरिता नगरपालिकेतील अधिकारी, कर्मचारी यांची चार टीम तयार करुन कामाचे वाटप करण्यात आले आहे. या स्वच्छता मोहिमेत प्रभाग क्र. ६ मधील पाण्याची टाकी जवळ, कुंभार वाडा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा या भागातील नाले, गटारी, रस्ते, खुल्या जागेतील परिसरात साफसफाई, फवारणी करुन परिसरातील सौंदर्यात भर पडण्याकामी यामध्ये ऑक्सिजन देणारी आणि फळझाडे यांचा देखील समावेश करण्यात आलेला आहे. नपामार्फत लागवड करण्यात येणार्‍या वृक्षाचे संगोपनात संबंधित भागातील नागरीकांनी नगरपालिकेस  सहकार्य करावे असे आवाहन नपा प्रशासनाने केले आहे.

Protected Content