एरंडोल प्रतिनिधी । एरंडोल येथे आरोग्य विभागातर्फे विलगिकरण कक्षाची निर्मिती एरंडोल तालुका ग्रामीण रुग्णालयात करण्यात आली. यावेळी आशाताई यांना तालुका आरोग्य अधिकारी डॉ.फिरोज शेख यांनी प्रशिक्षण दिले.
याप्रसंगी १३ अंगणवाडी सेविका, १६ आशाताई यांना प्रशिक्षण देण्यात आले. तालुका आरोग्य अधिकारी डॉ.फिरोज शेख यांनी कोणते लक्षण आल्यास कोणत्या गोळ्या द्यावा, लक्षणे कोणती आहेत, सलाईन कशी लावतात, इंजेकॅशन कसे लावणे याचे प्रशिक्षण दिले.
यावेळी प्रांत अधिकारी विनय गोसावी हजर होते. त्यांनी यावेळी पुढे रोग वाढल्यास अतिरिक्त मनुष्यबळ म्हणून तुमचे प्रशिक्षण शासन आदेशाने होत आहे. आपले गाव स्वस्थ तरच रोगावर नियंत्रण होईल आपण आता आरोग्य रक्षक आणि गाव रक्षक आहात असे सांगून त्यांचे मनोबल वाढविले.