एरंडोल प्रतिनिधी । येथील राष्ट्रीय महामार्गावरील धरणगाव चौफुलीवर केंद्र शासनाच्या पेट्रोल, डिझेल, गॅस दरवाढ व शेतकरी विरोधी कायद्याच्या विरोधात आ. चिमणराव पाटील यांच्या मार्गदर्शनाने व पारोळा कृषि उत्पन्न बाजार समितीचे सभापती तथा जळगांव जिल्हा बँकेचे संचालक अमोल पाटील यांच्या नेतृत्वाखाली आज दि.१२ डिसेंबर रोजी सकाळी ११:३० वाजता रास्तारोको आंदोलन करण्यात आले.
या आंदोलना प्रसंगी चौफुलीवरील चारही बाजूने वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. यावेळी जि.प. सदस्य नानाभाऊ महाजन, जि.प. सदस्य ज्ञानेश्वर आमले, एरंडोल तालुका शिवसेनेचे जेष्ठ नेते रमेश महाजन, पंचायत समिती उपसभापती अनिल महाजन, पंचायत समिती मा.सभापती दिलीप रोकडे, शिवसेना तालुकाप्रमुख वासुदेव पाटील, शिवसेना विधानसभा क्षेत्रप्रमुख जगदीश पाटील, माजी नगराध्यक्ष राजेंद्र चौधरी, नगरसेवक कुणाल महाजन, अतुल महाजन, चिंतामण पाटील, युवासेना तालुकाप्रमुख बबलु पाटील, माजी नगरसेवक नितीन बिर्ला, परेश बिर्ला, राजेंद्र महाजन, कमलेश पाटील, अमोल भावसार, ज्ञानेश्वर बडगुजर, भातखेडे, आनंदा धनगर, उत्राण, माजी सभापती किसन पाटील, मुकुंदा पाटील, मालखेडे, माजी नगरसेवक शालिक गायकवाड, उपतालुका प्रमुख रविंद्र चौधरी, कासोदा शहरप्रमुख महेश पांडे, शिवसेना विभाग प्रमुख देशमुख राठोड, राजेंद्र राठोड, गोविंदा राठोड, रवी जोगी, राजु जोगी, कुणाल पाटील, राज पाटील, गजानन पाटील, कल्पेश राजपुत आदी शिवसेना पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
https://www.facebook.com/508992935887325/videos/243379213791383