एरंडोल प्रतिनिधी । शहरासह तालुक्यात आज कोरोना बाधीत रूग्ण आढळून आलेल्या परिसरात प्रशासनातर्फे सील लावण्यात आले असून या भागात फवारणी, तपासणी आदी उपाययोजना करण्यात येत आहेत.
आज आलेल्या रिपोर्टमध्ये तालुक्यातून एकूण पाठविण्यात आलेल्या ६५ स्वॅबपैकी १७ रूग्ण पॉझिटीव्ह आढळून आल्याची माहिती प्रांताधिकारी विनय गोसावी यांनी दिली आहे. यात मेनरोड वरील ४० वर्षीय महिला, राम मंदिराजवळ ४५ वर्षीय महिला, नगरपालिकेजवळ ४७ वर्षीय पुरुष, सय्यद वाडा ७२ वर्षीय पुरुष, मारवाडी गल्ली ४० वर्षीय पुरुष, अमळनेर दरवाजा ३९ वर्षीय पुरुष; विठ्ठल मंदिराजवळ २७ वर्षीय डॉक्टर , देशपांडे गल्ली ३६ वर्षीय पुरुष, ग्रामीण रुग्णालय परिसर४८ वर्ष महिला, २७ वर्षे पुरुष, २३ वर्ष महिला व ७० वर्ष महिला; मानूधने गल्ली ४४ वर्षीय महिला, तसेच तालुक्यातील कढोली येथील ६५ वर्षीय पुरुष, ६० वर्षीय महिला व कासोदा येथील ५२ वर्षीय पुरुष असे रुग्ण आढळून आले आहेत.
सद्यस्थितीत एरंडोल तालुक्यातील २७ रुग्ण एरंडोल कोविड केअर सेंटरला तर १८ रुग्ण जळगाव कोविड केअर सेंटरला उपचार घेत आहेत. एरंडोल विभाग रुग्ण बरा होणे प्रमाण ६८%आहे. कन्टेन्टमेंट झोन बाहेर रुग्ण मिळण्याचे प्रमाण १०% च्या आत आहे.७०%पेक्षा जास्त पॉझीटीव्ह कॉन्टॅक्ट ट्रेसींग मधून झालेले असल्याची माहिती प्रांताधिकारी विनय गोसावी यांनी दिली.