एरंडोल प्रतिनिधी । शहरापासून जवळ असलेल्या हॉटेल फाऊंटननजीक झालेल्या अपघातात दुचाकीवरील शिक्षिकेसह तिच्या मुलाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी साडेदहा वाजता घडली.
सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षिका कविता कृष्णकांत चौधरी (वय-३५) रा. विद्यानगर एरंडोल ह्या मुलगा लावण्य कृष्णकांत चौधरी (वय-१०) याला दुचाकी (एमएच १९ डीबी ८७७९) ने दररोजप्रमाणे मुलाला घेवून शाळेत असतात. आज सकाळी १० वाजेच्या सुमारास मुलाला घेवून सोबत जात असतांना ट्रक ट्राला (जीजे २६ टी ८२६४) ने धडक दिली. यात माय लेकांचा मागच्या चाकात येवून जागीच मृत्यू झाला. अपघाताची माहिती कळताच एरंडोलचे पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव, सहाय्यक पोलिस निरीक्षक तुषार देवरे, अकिल मुजावर, संदीप सातपुते, मिलिंद कुमावत, पंकज आदींनी घटनास्थळी धाव घेत नागरीकांच्या मदतीने मृतदेह जिल्हा सामान्य रुग्णालयात हलवले.