पाचोरा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील भडगाव रोडवरील एम. एम. महाविद्यालयात रस्ते सुरक्षा अभियान संपन्न झाले. या अभियानात उपपरिवहन अधिकारी शाम लोही यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना रस्ते सुरक्षा संदर्भात मोलाचे मार्गदर्शन करत रस्त्यांवर चालतांना घ्यावयाची काळजी तसेच वाहतुक नियमांचे काटेकोरपणे पालन करावे यासह रस्ते सुरक्षा संदर्भात मार्गदर्शन केले.
या अभियानाचे उद्घाटन पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्थेचे चेअरमन संजय वाघ यांच्या हस्ते संपन्न झाले. याप्रसंगी आर. टी. ओ. इन्स्पेक्टर हेमंत सोनवणे, पाचोरा – भडगाव रोटरी क्लबचे अध्यक्ष तथा दिशा डेंन्टल क्लिनिकचे संचालक डॉ. अमोल जाधव, रोटरी क्लबचे सचिव डॉ. गोरख महाजन, प्रा. शिवाजी शिंदे, चंद्रकांत लोढाया व्यासपीठावर होते.
पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था व पाचोरा – भडगाव रोटरी क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने आज २० जानेवारी रोजी सकाळी १० वाजता शेठ मुरलीधरजी मानसिंगका महाविद्यालयात रस्ते सुरक्षा अभियानाचे आयोजन करण्यात आले होते. या अभियानाचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपपरिवहन अधिकारी शाम लोही यांनी उपस्थित विद्यार्थी, विद्यार्थीनी, प्राध्यापक, व कर्मचाऱ्यांनी रस्ते सुरक्षा अभियानाचा मुळ उद्देश सांगत रस्त्यावर वाहन चालवितांना, तसेच पायी चालतांना घ्यावयाची काळजी, वाहतुक नियमांचे काटेकोरपणे पालन कसे करावे, अपघात टाळण्यासाठी घ्यावयाची काळजी यासह विविध प्रकारचे मोलाचे मार्गदर्शन केले. या रस्ते सुरक्षा अभियानाचा महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने लाभ घेतला.