पाचोरा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । पाचोरा येथील भडगाव रोडवरील पांडव नगरी येथील रहिवासी व पाचोरा पोलिस ठाण्यात कार्यरत असलेले गोपनीय शाखेचे पोलिस नितीन सुर्यवंशी यांचे सुपुत्र कुणाल नितीन सुर्यवंशी हे नुकत्याच झालेल्या एमबीबीएस परीक्षेच्या शेवटच्या वर्षात प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहे.
कुणाल सुर्यवंशी यांचे प्राथमिक शिक्षण कासोदा व पाचोरा येथील कै. पी. के. शिंदे विद्यालयात झाले. तर १० ते १२ वी पर्यंत त्यांनी धुळे येथील एस. एस. व्ही. पी. एस. उच्च माध्यमिक विद्यालयात त्यांनी शिक्षण घेतले. त्यानंतर कळवा (ठाणे) येथील स्व. राजीव गांधी मेडिकल कॉलेजमध्ये एम. बी. बी. एस. प्रथम श्रेणीत मधुन उत्तीर्ण झाले. डॉ. कुणाल सुर्यवंशी यांच्या यशानंतर येथील पोलीस बाईज गृप व पाचोरा पत्रकारांतर्फे त्यांचा भव्य सत्कार करण्यात आला. त्यांचे पाचोरा पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक राहुल खताळ, सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल मोरे, जितेंद्र वल्टे, विजया वसावे, ए. पी. आय. रामभाऊ चौधरी, गोपनीय शाखेचे सुनिल पाटील, पोलिस काॅन्स्टेबल राहुल बेहरे, विनोद बेलदार, योगेश पाटील, विश्वास देशमुख, दिपक सुरवाडे, भगवान बडगुजर, विनोद शिंदे, शामकांत पाटील, मुकुंद परदेशी, दिलीप वाघमोडे, नरेंद्र नरवाडे, सुर्यकांत नाईक, प्रकाश पाटील, अशोक हटकर, हरिश अहिरे यांचेसह पाचोरा पोलिस स्टेशनचे पोलिस कर्मचारी यांनी अभिनंदन व कौतुक केले आहे. तसेच कुणाल सुर्यवंशी यांचेवर अनेक क्षेत्रातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. सुर्यवंशी यांची घरची परिस्थिती सर्वसाधारण असल्याने डॉ. कुणाल सुर्यवंशी यांनी गोरगरीब रुग्णांसाठी काम करणार असल्याचे सांगितले आहे.