जळगाव प्रतिनिधी । एमआयडीसी परीसरातील एका कंपनीच्या कार्यालयातून कॉम्प्यूटर, प्रिंटर आणि इतर साहित्या करणाऱ्या दोघांना पोलीसांनी अटक केली असून त्यांच्या ताब्यातील मुद्देमाल हस्तगत केला आहे. दोघांविरोधात एमआयडीसी पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत माहिती अशी की, एमआयडीसी परिसरातील सेक्टर नंबर डी. १०४ व डी. १०५ मधील मोरया ग्लोबल लि.कंपनीच्या कार्यालयातून दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश केले. चोरट्यांनी कार्यालयातील एकूण १ लाख १८ हजार किंमतीचे कॉम्पुटर प्रिंटर व इतर साहित्य लंपास केले. याबाबत पुरुषोत्तम बद्रीनाथ पाटील (वय ४७, सदगुरुनगर, अयोध्या नगर) यांनी फिर्याद दिली आहे. त्यावरुन एमआयडीसी पोलीस ठाण्यात २३ रोजी गुन्हा दाखल झाला आहे. यासंदर्भात पोलीस निरीक्षक रणजित शिरसाठ यांनी गुन्हा उघडकीस येवून चोरट्यांना जेरबंद करण्यासाठी पथक तयार केले.
या पथकाने तपासाचे चक्र फिरवले. याप्रकरणी सागर देवचंद महाजन (वय १९, रा. सप्तश्रृंगी मंदिराजवळ, रामेश्वर कॉलनी) आणि मनोज आधार सोनवणे (वय १९, रा. आसोदा रोड, मोहन टाकीजसमोर, के.सी. नगर) यांना ताब्यात घेतले. त्यांच्या ताब्यातून चोरीस गेलेला मुद्येमाल जप्त करण्यात आला आहे. यात एक लाख १८ हजार ४६२ रुपये किमतीचे तीन चार कॉम्प्युटर, प्रिंटर व त्यासाठी लागणारे अन्य साहित्य जप्त करण्यात आले आहे.
यातील आरोपी सागर देवचंद महाजन हा या कंपनीत कॉन्ट्रँक बेसवर कामाला होता. दुसरा आरोपी मनोज आधार सोनवणे हा त्याचा साथीदार आहे. त्यांनी चोरीचा माल पुण्यात नेला होता. तो पोलिसांनी हस्तगत केला आहे. या प्रकरणातील आरोपींना न्यायालयात हजर केले असता त्यांना २६ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. तपास सहाय्यक फौजदार आनंदसिंग पाटील व कॉन्स्टेबल सचिन पाटील करीत आहोत.