जळगाव प्रतिनिधी । कोरोना विषाणूमुळे हातमजूरांवर उपासमारीची वेळ आली आहे. अशांना एमआयडीसी पोलीस स्टेशनतर्फे अश्या गरजू कुटुंबांना धान्य व जीवनावश्यक वस्तूंचे वाटप विभागीय पोलीस उपअधिक्षक डॉ. निलाभ रोहन यांच्यास्ते गुरूवारी करण्यात आले.
याप्रसंगी एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विनायक लोकरे, सपोनि अमोल मोरे, पोउनि गणेश कोळी, पोउनि विशाल सोनवणे, सफौ आनंदसिंग पाटील, अतुल वंजारी, रामकृष्ण पाटील, पोकॉ अशोक संगत, नितीन पाटील, महेंद्रसिंग पाटील, दादासाहेब वाघ, इम्रान सय्यद, मुदस्सर काझी, माजी सैनिक रविंद्र बाविस्कर, महिला पोलीस मालती बैसाने, नगरसेवक मनोज अहुजा, पोलीस बाईज अनिल सोनवणे यांच्यासह पोलीस मित्र परिवारातील सदस्य उपस्थित होते.