जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । एमआयडीसीतील ई-सेक्टरधील गोपाल दाल मील येथे भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या तरूणाला दगड मारून जखमी करत जीवेठार मारण्याची धमकी दिल्याची घटना बुधवारी १५ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ७ वाजता घडली आहे. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव शहरातील एमआयडीसीतील ई सेक्टर मधील गोपाल दाल मिल परिसरात महेश दिलीप घुगे (वय-३५) रा. देविदास कॉलनी यांच्या मेहुणे योगेश आंधळे आणि सचिन निंबा आंधळे रा. रामेश्वर कॉलनी यांचे बुधवारी १५ फेब्रुवारी रोजी भांडण सुरू होते. हे भांडण सोडविण्यासाठी महेश घुगे यांनी मध्यस्थी करून भांडण सोडविण्याचा प्रयत्न केला. या राग आल्याने सचिन आंधळे याने शिवीगाळ करून हातातील दगड महेशच्या डोक्याला मारला. तसेच आमच्या भांडणाच्या मध्ये पडला तर जीवेठार मारेल अशी धमकी दिली. दगड मारल्याने महेशच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्याने दिलेल्या तक्रारीवरून संशयित आरोपी सचिन निंबा आंधळे रा. रामेश्वर कॉलनी याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ कृष्णा पाटील करीत आहे.