जळगाव प्रतिनिधी । एमआयडीसी कंपनीत जाणाऱ्या दुचाकीधारकाला ॲपेरिक्षाने कट मारल्याने झालेल्या अपघातात दुचाकीस्वारा गंभीर दुखापत झाली आहे. ही घटना काल मंगळवारी २७ जुलै रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास घडली. रात्री उशीरा १० वाजता रिक्षाचालकाविरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर माहिती अशी की, नेमचंद मोतीलाल येवले (वय-३२) रा. सम्राट कॉलनी जळगाव हे आपल्या कुटुंबियांसह राहतात. ते एमआयडीसी कंपनीत कामाला आहे. काल मंगळवारी २७ जुलै रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास (एमएच १९ डीएम ९४८९) दुचाकीने कामावर निघाले. एमआयडीसीतील अरिअंत कंपनीच्या गेटसमोरून जात असतांना त्यांच्या दुचाकीच्या पुढे जात असलेली ॲपेरिक्षा (एमएच १९ सीडब्ल्यू ४२९५) या रिक्षाने सिग्नल न देता थेट वळण घेतले. त्यात मागून येणारे दुचाकीवरील नेमचंद येवले हे गंभीर जखमी झाली. त्यांनी खासगी वाहनाने शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. मंगळवारी रात्री १० वाजता येवले यांच्या फिर्यादीवरून रिक्षा ( एमएच १९ सीडब्ल्यू ४२९५ ) अज्ञात रिक्षा चालकावर एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक प्रदिप पाटील हे करीत आहे.