जळगावातील एमआयडीसीत मध्यरात्री अज्ञातांनी उभा ट्रक पेटविला (व्हिडीओ)

जळगाव प्रतिनिधी । शहरातील एमआयडीसी परिसरात सुप्रिम कॉलनी भागात मध्यरात्री पाईपाने भरलेला उभा ट्रक अज्ञातांनी पेटवून दिल्याचा प्रकार घडला. यात ९ ते १० लाखांचे नुकसान झाले असून एमआयडीसी पोलीसात अज्ञातांवर गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू आहे.

अधिक माहिती अशी की, सप्रिम कॉलनी परिसरात असलेल्या ममता बेकरी जवळ ट्रक क्रमांक (एमएच १९ झेड २००९) पाईपाने भरलेला होता. अचानक मध्यरात्री ३ वाजेच्या सुमारास अज्ञात व्यक्तींनी पाईपाने भरलेला उभ्या ट्रकला पेटवून दिला. काही वेळात आगीने रौद्ररूप धारण केले. लागलेल्या आगीत आगीचे मोठे लोळ निघत होते. आग लागल्याचे पाहून परीसरातील नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले होते. काही स्थानिक रहिवाशांनी घटनास्थळी धाव घेवून आग विझविण्याचा प्रयत्न केला. ४ वाजेच्या सुमारास महानगरपालिकेचा अग्निशमन बंब घटनास्थळी दाखल झाले. तासाभरात ही आग‍ विझविण्यात आली. या आगीत ४ लाख रूपये किंमतीचा ट्रकसह ५ लाखाचे ७.५ टन पिव्हीसी पाईप पुर्णपणे जळून खाक होवून सुमारे ९ ते १० लाखांचे नुकसान झाले आहे. दरम्यान ट्रकमालक हा गेंदालाल मिल परिसरातील रहिवाशी असल्याचे समजते. घटनास्थळी एमआयडीसी पोलीसांनी धाव घेवून पंचनामा करण्यात आले. अद्यापपर्यंत पोलीसात यांची नोंद करण्यात आलेली नाही.

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/3977974548929441/

Protected Content