बोदवड, सुरेश कोळी | यंदाच्या शैक्षणिक वर्षांत इयत्ता पाचवी ते सातव्या वर्गाची,शाळेची पहिली घंटा वाजली.पहिल्याच दिवशी सवंगड्यांना भेटण्याची ओढ, नवीन गणवेश आणि शालेय साहित्य मिळाल्याने बालकांच्या चेहऱ्यावर पसरलेला आनंद गगनात मावेनासा होता.
उन्हाळी सुट्टी संपल्यानंतर तब्बल चार महिन्यांनंतर बुधवारी शाळेची (५ वी ते ७ वी)पहिली घंटा वाजली. जी. डी. हायस्कूलमध्ये इयत्ता आठवी ते दहावी चे वर्ग १५ जुलै पासून नियमितपणे सुरू आहेत. शाळेत प्रवेशोत्सवाची धूम बघायला मिळाली. शिक्षकांसह शालेय समितीतील पदाधिकाऱ्यांनी शाळेत पाऊल ठेवणाऱ्या विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प देऊन, बँड पथकाच्या निनादात स्वागत केले. शाळा सुशोभित करण्यात आली होती.
बोदवड तालुका युवक राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष विनोद कोळी यांनी सर्व विद्यार्थ्यांना चॉकलेट देऊन, त्यांचा उत्साह वाढविला. यावेळी मुख्याध्यापक डॉ. पुरुषोत्तम संभाजीराव गड्डम यांनी सर्व विद्यार्थ्यांना स्वखर्चाने मास्कचे वाटप केले. शाळेचा पाहिलाच दिवस असला तरी आज ८० टक्के विद्यार्थ्यांनी हजेरी लावली होती. जेष्ठ शिक्षक जी. जी. जावळे, पी. एस. बोंडे, एस. ए. पाटील, एस. व्ही. वराडे ,सौ. आर. के. भंगाळे, एस. टी. पावरा, जी. यु. किनगे तथा शिक्षकेतर कर्मचारी एन. एन. बोंडे, हेमंत पाटील, अशोक तायडे, सुरेश शिरसाठ, योगिता निकम आणि ग्रंथपाल डी. आर. पाटील यांनी विद्यार्थी प्रवेश करतांना शाळेच्या प्रवेशद्वाराजवळ प्रत्येक विद्यार्थ्यांची थर्मल स्कँनिंगद्वारे शारीरिक तापमान तपासणी केली. पल्स ऑक्सिमिटरद्वारे शरीरातील प्राणवायू पातळी तपासून घेत प्रत्येक विद्यार्थ्यांचे हात सॅनिटाईज करून घेतले.
https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/1223633508116802