भुसावळ, प्रतिनिधी । कोरोनाच्या या वैश्विक महामारीच्या काळात भारतातील रेल्वे अपेन्ट्रीसधारक एका वर्ष कोणतेही मानधन न घेता सेवा करण्यास उत्सुक असल्याची माहिती ऑल इंडिया रेल्वे अपेन्ट्रीसचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष भरत परदेशी यांनी दिली.
भारतातील अपेन्ट्रीसधारक हे भारतीय रेल्वे सोबत असून या कोरोनाच्या वैश्विक महामारीमध्ये भारताची आर्थिक तसेच रेल्वे मंत्रालयाची आर्थिक स्थिती पाहता संपूर्ण भारतभरातील ५० हजारच्या जवळपास रेल्वे अपेन्ट्रीस युवक एक वर्ष कोणतेही मानधन न घेता रेल्वेची सेवा करण्यास उत्सुक आहेत. कारण रेल्वे मंत्रालयाला अपेन्ट्रीस यूवकांमुळे १५ अरब रुपयांचा फायदा तसेच सुदृढ मनुष्य बळ मिळणार असल्याचे प्रदेश अध्यक्ष भरत परदेशी यांनी कळविले आहे. एआएआरएफ महामंत्री शिवगोपाल मिश्रा यांनी रेल्वे मंत्री पियुष गोयलr यांच्या दिल्लीच्या निवासस्थानी जाऊन भेट घेऊन रेल्वे कर्मचाऱ्याच्या विविध समस्यांवर चर्चा केली. बऱ्याच दिवसापासून प्रलंबित असलेल्या काही मागण्यांना पूर्ण करण्यासाठी रेल्वे मंत्री यांनी हिरवा कंदील दिला आहे. व त्याविषयीचे आदेश सुद्धा रेल्वेमंत्री यांनी रेल्वेबोर्ड तसेच सीआरबी यांना दिले आहे.