नवी दिल्ली वृत्तसंस्था । मोदी सरकारने अवघ्या एका दिवसात सवर्णांना आरक्षणाचा प्रस्तरस तयार केला असून याची अगदी बहुतांश मंत्र्यांनाही कल्पना नसल्याची धक्कादायक बाब आता समोर आली आहे.
केंद्रातील मोदी सरकारने सोमवारी गरीब सवर्णांना १० टक्के आरक्षण देण्याची घोषणा केली. यानंतर हे विधेयक मंगळवारी लोकसभेत संमत करण्यात आले असून याला आज राज्यसभेत मांडण्यात येणार आहे. तथापि, एवढा महत्वाचा असणारा हा निर्णय पंतप्रधानांसह अगदी थोड्या मंत्र्यांनाच माहिती होता. एवढेच नव्हे तर याचा प्रस्ताव अवघ्या एका दिवसात बनविण्यात आल्याची माहिती आता समोर आली आहे. अर्थात, हा निर्णय अगदी घाई गडबडीत घेण्यात आल्याचेही यातून स्पष्टपणे अधोरेखीत झाले आहे.