एका भागातील महिलेचा विनयभंग

जळगाव शहरातील प्रभात कॉलनी परिसरातील एका भागात ३३ वर्षीय महिलेचा मध्यरात्री विनयभंग केल्याची घटना घडली आहे. याबाबत रविवारी २१ मे रोजी रात्री ९ वाजता दोन जणांविरोधात रामानंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

अधिक माहिती अशी की, जळगाव शहरातील प्रभात कॉलनी परिसरातील एका भागात ३३ वर्षीय महिला आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. २१ मे रोजी मध्यरात्री १ वाजेच्या सुमारास त्यांच्या पोटात दुखत असल्याने हे रात्री घराच्या बाहेर पायी फिरत होत्या. दरम्यान, सुनिल चुनिलाल पाटील हा घराच्या बाहेर लघुशंका करीत होता. त्यावर त्याला हटकले असता त्याने महिलेचा हात पकडून तिला लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करत तिचा विनयभंग केला. हा प्रकार घडल्यानंतर महिला आपल्या ही बहिणीसोबत रामानंद नगर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून सुनिल चुनीलाल पाटील आणि परिक्षीत सुनिल पाटील या दोघांवर रामानंद नगर पोलीस ठाण्यात २१ मे रोजी रात्री ९ वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास महिला पोलीस हेडकॉन्स्टेबल उषा सोनवणे करीत आहे.

Protected Content