जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । मांडे बनवण्याच्या दुकानात एका कामगाराला दुसऱ्या कामगाराने लाकडी काठीने मारहाण करून जखमी केल्याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, तांबापुरा परिसरातील रहिवासी शेख अख्तर शेख नईम हे दुध फेडरेशन रोडला लागून गेंदालाल मिल परिसरात असलेल्या मांडे बनवण्याच्या दुकानात कामाला आहेत. ३ मे रोजी रात्री अडीच वाजेच्या सुमारास पीठ मारण्याचे काम करत असताना दुकानातील अक्रम रहीम कुरेशी या कामगाराने शेख अख्तर यांच्यासोबत पीठ लवकर मळण्याच्या कारणावरून वाद घातला. या वादातून त्यांनी शेख अख्तर यांना शिवीगाळ करत असलेल्या लाकडी पाटीने कमरेवर तसेच हाता जवळ मारहाण करून दुखापत केली. यात जखमी शेख अख्तर तर यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे दाखल करण्यात आले. शेख अख्तर यांच्या उजव्या बाजूकडील बरगडी फ्रॅक्चर झाली आहे. या प्रकरणी जखमी शेख अख्तर यांची पत्नी शेख रुक्सार शेख अख्तर हीने दिलेल्या तक्रारीवरून शुक्रवार ६ मे रोजी अक्रम रहीम कुरेशी याच्या विरोधात शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलिस नाईक रवींद्र पाटील हे करीत आहेत.


