जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । मुलाचा शाळेचा दाखला मागल्याचा कारणावरून तरूणाला लाकडी दांडक्याने मारहाण करून जखमी केले तर जीवेठार मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार पिंप्राळा हुडको परिसरात घडला आहे. याप्रकरणी शनिवारी ३ डिसेंबर रोजी रात्री ११ वाजता रामानंदनगर पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेली माहिती अशी की, गणेश सखाराम भंडारे (वय-३२) रा. कुसुंबा ता.जि.जळगाव हे आपल्या पत्नी व मुलासह वास्तव्याला आहे. मजूरी करून आपला उदरनिर्वाह करतात. गणेश भंडारे यांचा मुलगा येशू याचा शाळेचा दाखल मागण्यासाठी गणेश हे पत्नीसह शहरातील पिंप्राळा हुडको परिसरात शनिवारी ३ डिसेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता गेले. त्याठिकाणी गणेश याचे पत्नीसोबत शब्दीक भांडण सुरू झाले. यावेळी विनोद बोरसे रा. पिंप्राळा हुडको, जळगाव याने त्यांच्या हातातील लाकडी दांडक्याने गणेशच्या डोक्यावर मारहाण केली. तसेच दोन्ही पायांवर मारून गंभीर दुखापत केली आणि जीवेठार मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्यात धाव घेवून रात्री ११ वाजता एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक कालसिंग बारेला करीत आहे.