जळगाव प्रतिनिधी । शहरातील मु.जे. महाविद्यालयाजवळ दोन तरूणांनी एकमेकांना रागाने बघितल्याच्या कारणावरून बेदम मारहाण आणि चाकूने वार केल्याची घटना काल १४ ऑक्टोबर रोजी दुपारी दीड वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत माहिती अशी की, सारंग डिगंबर कोळी (वय-१८) रा. स्टेट बँक कॉलनी महाबळ हा तरूण मु.जे. महाविद्यालयासमोर पायल टी सेंटर येथे काल गुरूवारी १४ ऑक्टोबर रोजी दुपारी दीड वाजेच्या सुमारास बसलेले असतांना गोलू उर्फ स्वप्निल ठाकूर रा. तुकाराम वाडी जळगाव यांच्यासह इतर दोघेजण यांनी एकमेकांना रागाने बघितल्याच्या कारणावरून शिवीगाळ व मारहाण केली. यावेळी गोलू ठाकूर याने चाकू मारून सारंग कोळी याला जखमी केले. याप्रकरणी सारंग कोळी यांच्या फिर्यादी गोलू उर्फ स्वप्निल ठाकूर याच्यासह इतर दोन अनोळखी व्यक्तीविरोधात रामानंदनगर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक विनोद सोनवणे करीत आहे.