उसनवारीच्या पैशांवरून एकाला काठीने मारहाण; जामनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

जामनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जामनेर तालुक्यातील खडकी गावात उसनवारीच्या पैश्यांवरून ५५ वर्षीय प्रौढ व्यक्तीला काठीने बेदम मारहाण करून गंभीर दुखापत केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरण जामनेर पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

जामनेर पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रकाश धनसिंग नाईक (वय-५५) रा. खडकी ता.जामनेर हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. शेतीचे काम करून आपला उदरनिर्वाह करत असतात. शविवारी ४ मार्च रोजी रात्री ९ वाजेच्या सुमारास उसनवारीच्या पैशांवरून गावात राहणारा देवचंद बद्री नाईक याने अश्लिल शिवीगाळ करून काठीने बेदम मारहाण करून गंभीर जखमी केले. तसचे जिवेठार मारण्याची धमकी दिली. यानंतर प्रकाश नाईक यांनी जामनेर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून ५ मार्च रोजी सकाळी ११ वाजता जामनेर पोलीस ठाण्यात संशयित आरोपी देवचंद बद्री नाईक याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील  तपास पोहेकॉ मुकुंदा पाटील करीत आहे.

Protected Content