सावदा : प्रतिनिधी । उभ्या डम्परवर धडकून दुचाकीस्वार ठार झाल्याची घटना काल रात्री येथे घडली
येथील रावेर मार्गावरील हॉटेल कुंदन जवळ काल रात्री दुचाकीवरून ( क्र – एम एच १९ – सी एल ७२५७ ) जाणारे लक्ष्मण पाटील ( वय -६० , रा – गवत बाजार , सावदा ) रस्त्यावर अंधारात उभ्या असलेल्या डम्परवर धडकून ठार झाले या दुर्घटनेत त्यांच्या दुचाकीचेही बरेच नुकसान झाले या अपघाताबद्दल भूषण पाटील यांच्या फिर्यादीवरून सावदा पोलीस ठाण्यात डम्पर ( क्र – एम एच १९ – सी वाय – ४८७६ ) च्या चालाकाविरोधात गु र न ९६ भा द वि कलम ३०४ ( अ ) , २७९ , ३३७ , ३३८ , ४२७ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे रस्त्यावर अंधार असूनही इंडिकेटर न लावता निष्काळजीपणे वाहन उभे करून दुचाकीस्वाराच्या मृत्यूस काराभूत ठरला म्हणून डम्पर ( क्र – एम एच १९ – सी वाय – ४८७६ ) च्या चालाकाविरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पो हे कॉ उमेश पाटील करीत आहेत