उपसा सिंचन योजनेची अठरा लाखांची पाईप लाईन चोरट्यांनी लांबवली

वरणगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी |  फुलगाव तळवेल-ओझरखेडा गावठाण जमिनीवर तब्बल १८  लाख रुपये किंमतीची पाईप लाईन चोरट्यांनी गॅस कटरद्वारे लांबवल्याने खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे ही चोरी दहा वर्षाच्या कालावधीत झाली असून याची संबंधित विभागाला आता जाग येवून त्यांनी  गुरुवारी वरणगाव पोलिसात तक्रार दाखल केली आहे. यातून संबधित विभागाचा भोंगळ कारभार उघड झाला आहे.

 

 

 

मौजे तळवेल, फुलगाव व ओझरखेडा शिवारात वरणगाव- तळवेल उपसा सिंचन योजनेची पाईप लाईन अंथरण्यात आली आहे.  चोरट्यांनी २०१२  ते २०  ऑगस्ट २०२२  दरम्यान केव्हातरी संधी साधून तब्बल ३ हजार ६०० किलो वजनाची व १४ मिलिमीटर जाडीची पाईप लाईन गॅस कटरचा वापर करून लांबवल्याने खळबळ उडाली आहे. तब्बल दहा वर्षांच्या कालावधीत हा प्रकार घडल्यानंतर संबंधित विभागाने गुरुवारी वरणगाव पोलिसात तक्रार दाखल केल्याने या विभागाचा भोंगळ कारभार उघड झाला आहे. तळवेल उपसा सिंचन बांधकाम विभागाचे शाखा अभियंता तुषार रामचंद्र राजपूत (२८ , खोटेनगर, जळगाव) यांनी वरणगाव पोलिसात दिलेल्या फिर्यादीनुसार अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापूर्वी १२ लाखांच्या पाईप लाईनची चोरी पिंप्रीसेकम शिवारातील गावठाण जमिनीवरील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मालकिची ओझरखेडा धरण ते दिपनगर केंद्रा दरम्यानची ८६३  मेट्रीक टन वजनाची व ११  लाख ६६  हजार १३१  रुपये किंमतीची पाईप लाईन चोरट्यांनी १५  जुलै ते २०  ऑगस्टच्या दरम्यान केव्हातरी लांबवली होती. या प्रकरणी भुसावळ तालुका पोलिसात मंगळवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

Protected Content