उपमुख्यमंत्री ना. पवार यांच्या प्रतिमेला वाढदिवसानिमित्ताने जिल्हा काँग्रेस विद्यार्थी संघटनेतर्फे दुग्धाभिषेक

जळगाव, प्रतिनिधी । राज्याचे उपमुख्यमंत्री ना. अजित पवार यांच्या ६१ व्या वाढदिवसानिमित्त काँग्रेस भवन येथे त्यांच्या प्रतिमेचा दुग्धाभिषेक करून एक आगळ्यावेगळ्या पद्धतीने काँग्रेस पक्षाच्या विद्यार्थी संघटनेने महाविकास आघाडी सरकारमधील राष्ट्रवादी काँग्रेस या घटक पक्षांच्या नेत्यांचा वाढदिवस साजरा केला.

उपमुख्यमंत्री ना. अजित पवार यांची आहे. अतिशय उत्कृष्टपणे काम करण्याची पद्धत आजच्या तरुण पिढीला आ. पवार यांची आजच्या तरुण पिढीला नेहमीच आकर्षित करते त्याच अनुषंगाने ना. अजित पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत त्यांच्या या कार्याचा गौरव करण्यासाठी एनएसयुआयच्या वतीने त्यांच्या प्रतिमेस दुग्धभिषेक सोहळा करून त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या. संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये मागील पाच वर्षांमध्ये सत्ताधारी म्हणून व आता सत्ता गेल्यानंतर विरोधी पक्ष म्हणून अशा दोन्ही बाजूंनी संपूर्णपणे अपयशी ठरलेले भाजप पक्ष व त्यांचे नेते महाविकास आघाडी सरकारच्या कामांमध्ये आडकाठी व महाराष्ट्रातील दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांना भडकवण्याचे काम व दुधात मिठाचा खडा टाकण्याचे काम भाजप पक्ष सध्या करीत आहे. त्यांच्या महाराष्ट्र राज्यामधील सुरु असलेल्या आंदोलना प्रत्युत्तर म्हणून धडाडीचे कार्य करणाऱ्या महाविकास आघाडी सरकारचे उपमुख्यमंत्री ना. अजित पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून त्यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी व भाजपाला प्रत्युत्तर देण्यासाठी जळगाव जिल्हा एनएसयुआयच्या वतीने नामदार अजित पवार यांच्या प्रतिमेचा दुग्धाभिषेक सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.  संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये मागील पाच वर्षांमध्ये सत्ताधारी म्हणून व आता सत्ता गेल्यानंतर विरोधी पक्ष म्हणून अशा दोन्ही बाजूंनी संपूर्णपणे अपयशी ठरलेले भाजप पक्ष व त्यांचे नेते महाविकास आघाडी सरकारच्या कामांमध्ये आडकाठी व महाराष्ट्रातील दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांना भडकवण्याचे काम व दुधात मिठाचा खडा टाकण्याचे काम भाजप पक्ष सध्या करीत आहे. त्यांच्या महाराष्ट्र राज्यामधील सुरु असलेल्या आंदोलना प्रत्युत्तर म्हणून धडाडीचे कार्य करणाऱ्या महाविकास आघाडी सरकारचे उपमुख्यमंत्री ना. अजित पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून त्यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी व भाजपाला प्रत्युत्तर देण्यासाठी जळगाव जिल्हा एनएसयुआयच्या वतीने नामदार अजित पवार यांच्या प्रतिमेचा दुग्धाभिषेक सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे, अल्पसंख्यांक विभागाचे शहराध्यक्ष अमजद पठाण युवक काँग्रेस शहराध्यक्ष मुजीब पटेल जाकिर बागवान योगेश देशमुख वासुदेव महाजन उध्दव वाणी सत्यम कुमार दलित कुमार पी. जी.  पाटील आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Protected Content