उपमहापौर खडके यांच्या जनता दरबारात तक्रारींचा पाऊस (व्हिडिओ)

 

जळगाव, प्रतिनिधी । उपमहापौर आपल्या दारी या उपक्रमाच्या याश्वितेनंतर सुनील खडके हे आजपासून प्रत्येक गुरुवारी जनता दरबार घेऊन नागरिकांच्या समस्या सोडविण्यात येणार आहे. आज पहिल्याच दिवशी जवळपास १५० तक्रारी प्राप्त झाल्या आहेत.

सकाळी ठीक ११ वाजता महापालिकेच्या प्रांगणात उपमहापौर सुनील खडके यांनी जनता दरबार भरविला होता. याप्रसंगी महापौर भारती सोनवणे, स्थायी समिती सभापती राजेंद्र घुगे पाटील, महिला व बालकल्याण समिती सभापती रंजना सपकाळे. आयुक्त सतीश कुळकर्णी, नगरसेविका अॅड. शुचिता हाडा, रेश्मा काळे, नगरसेवक अमित काळे, किशोर बाविस्कर, मनोज आहुजा आदी उपस्थित होते. उपमहापौर सुनील खडके यांच्या जनता दरबारात गटारी, रस्ते, लाईट, अमृत योजनेमुळे खराब झालेले रस्ते तसेच शिवाजीनगर उड्डाणपूलाचे होणारे संथ गतीच्या कामाबाबत तक्रार करण्यात आली. यावेळी महापालिकेचे सर्व विभांगांचे प्रमुख उपस्थित होते. उपमहापौर खडके यांनी नागरिकांच्या तक्रारी एकून घेत अधिकाऱ्यांशी लागलीच चर्चा करून समस्येवर तोडगा काढण्याचा प्रयत्न केला. उपमहापौर खडके यांनी सुरु केलेल्या ‘जनता दरबाराबाबत’ नागरिकांनी समाधान व्यक्त करत उपमहापौर यांच्या स्तुत्य उपक्रमाबाबत त्यांचे कौतुक केले.

भाग-१

https://www.facebook.com/508992935887325/videos/3686627154718719

भाग-२
https://www.facebook.com/508992935887325/videos/740685830162680

भाग-३
https://www.facebook.com/508992935887325/videos/418220599519101

Protected Content