उपमहापौरांच्या जनता दरबारात समस्यामांडण्यासाठी नागरिकांची गर्दी (व्हिडिओ )

 

जळगाव, प्रतिनिधी । उपमहापौर सुनील खडके यांनी आयोजित ‘जनता दरबार’ मध्ये नागरिकांनी आपल्या समस्या मांडण्यासाठी गर्दी केली होती. महापालिकेच्या प्रशासकीय इमारतीच्या प्रांगणात ‘जनता दरबार’ भरविण्यात आला होता.

उपमहापौर सुनील खडके यांच्या सोबत महापौर सौ. भारती सोनवणे, महिला व बालकल्याण समिती सभापती रंजना सपकाळे, पाणीपुरवठा सभापती अमित काळे, आरोग्य समिती सभापती चेतन सनकत, अॅड. शुचिता हाडा, नगरसेविका पार्वताबाई भिल आदी उपस्थित होते. या पदाधिकाऱ्यासह महापालिकेचे अधिकारी व विभाग प्रमुख उपस्थित होते. उपमहापौर सुनील खडके यांनी प्रारंभ केलेल्या जनता दरबार उपक्रमाचे नागरिकांनी कौतुक केले. आज जनता दरबाराचा दुसरा दिवस होता. आज देखील अमृत योजना, नळ कनेक्शन, खड्डे यासंदर्भातील प्रमुख तक्रारी मांडण्यात आल्या. आज जवळपास १५० नागरिकांनी आपली तक्रार उपमहापौर सुनील खडके यांच्याकडे मांडल्यात.

भाग १

https://www.facebook.com/508992935887325/videos/169876848245672

भाग २

 

https://www.facebook.com/508992935887325/videos/1347427558951291

 

Protected Content