जळगाव प्रतिनिधी । नवीन बसस्थानकाजवळ असलेल्या डॉ. नवल पाटील यांच्याकडे तपासणीसाठी आलेल्या 40 वर्षीय रूग्णांचा अचानकपणे छातीत दुखून मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी 10.30 वाजेच्या सुमारास घडली. मात्र डॉ. नवल पाटील यांनी चुकीचे इंन्जेक्शन दिल्याने रूणाचा मृत्यू ओढावला असा आरोप मयताची पत्नीयांच्यासह नातेवाईकांनी केला. संबंधित डॉक्टरावर गुन्हा दाखल झाल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नाही असा पवित्रा नातेवाईकांनी घेतला आहे.
याबाबत सामाजिक कार्यकर्ते सद्दाम खान रा. हुडको यांनी दिलेली माहिती अशी की, संजय भिवसन गांगुर्डे (भिल) रा.पिंप्राळा हुडको हे हात मजूरीचे काम करतात. आज सकाळी त्यांची तब्बेत बरी नसल्याने त्यांना पत्नी कल्पना गांगुर्डे यांनी सकाळी 9 वाजता शहरातील नवीन बसस्थानकाजवळ असलेल्या डॉ. नवल पाटील यांच्या हॉस्पिटलमध्ये उपचारार्थ दाखल करण्यात आले. रूग्णांची गर्दी असल्याने अर्धातासानंतर त्यांचा नंबर लागला. डॉ. नवल पाटील यांनी त्यांना इंन्जेक्शन दिले असता त्यांच्या तोंडातून फेस येवू लागल्याने त्यांची तब्बेत अजून बिघडली. यावर डॉ.पाटील यांनी रूग्णवाहिकेद्वारे ओम क्रिटीकल हॉस्पिटलमध्ये पाठविले. मात्र ओम क्रिटीकल हॉस्पिटल यांनी रूग्ण मयत झाल्याचे नातेवाईकांना सांगितले. यावेळी मयताची पत्नी कल्पना यांनी एकच हंबरडा फोडला. दरम्यान शवविच्छेदनासाठी मृतदेह जिल्हा रूग्णालयात आणण्यात आला.
गुन्हा दाखल करण्याची मागणी
याबाबत मयत पत्नी कल्पना गांगुर्डे आणि सामाजिक कार्यकर्ते सद्दाम खान यांच्यासह नातेवाईकांना डॉ. नवल पाटील यांनी चुकीच्या इंजेक्शन दिल्याने संजय गांगुर्डे यांचा मृत्यू झाला असा आरोप करत संबंधीत डॉक्टरची चौकशी करून गुन्हा दाखल करावा व इन कॅमेरा मृतदेहावर शवविच्छेदन करण्यात यावे अशी मागणी केली. घटनेची माहिती मिळाल्यानंतर जिल्हा पेठ पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक जिल्हा रूग्णालयात येवून नातेवाईकांची भेट घेतली आहे.