उन्नाव बलात्कार : पीडितेच्या वडिलांच्या हत्येप्रकरणी आमदार कुलदीप सिंह सेनगरला दहा वर्षांची शिक्षा

लखनऊ (वृत्तसंस्था) उन्नाव बलात्कार पीडितेच्या वडिलांच्या हत्येप्रकरणी भाजपाने पक्षातून निलंबित केलेला उत्तर प्रदेशातील आमदार कुलदीप सिंह सेनगर याला १० वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. दरम्यान, यावेळी न्यायालायने सेनगरला १० लाखांचा दंडही ठोठावला आहे.

 

उन्नाव पीडितेच्या वडिलांचा एप्रिल २०१८ मध्ये न्यायालयीन कोठडीत मृत्यू झाला होता. या हत्येप्रकरणी न्यायालयाने ही शिक्षा सुनावली. न्यायालयाने पीडितेच्या वडिलांच्या मृत्यूप्रकरणी सदोष मनुष्यवध व गुन्हेगारी कटाच्या आरोपाखाली त्याला दोषी ठरवले होते. २०१७ मध्ये उन्नाव येथील अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी गेल्या वर्षी न्यायालायने त्याला दोषी ठरवले होते. २०१७ मध्ये उन्नाव येथील अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी गेल्या वर्षी न्यायालायने त्याला दोषी ठरवले आहे.

Protected Content