जळगाव, लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | तेजोदिप नववीचार फाउंडेशनतर्फे उद्योग , व्यवसाय ,करिअर मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमात उपस्थितासाठी मोफत मार्गदर्शन करण्यात आले. कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
मायादेवी नगर रोटरी हॉल येथे आयोजित उद्योग, व्यवसाय, करिअर मार्गदर्शन कार्यक्रमात व्यासपीठावर महापौर जयश्री महाजन, रवींद्र लढ्ढा, कार्यक्रम तथा फाउंडेशन अध्यक्ष राजेश नेहते, महिला स्वयंरोजगार मार्गदर्शक स्वाती शहा, शेतीपूरक व्यवसाय मार्गदर्शक सागर धनाड, कौशल्य विकास मार्गदर्शक रागीब अहमद, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक प्रवीण नायसे उपस्थित होते.
मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन व सतं झेंडूजी महाराज व तोताराम महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी पुस्तक सुची प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले व विविध क्षेत्रातील उल्लेखनीय काम करणाऱ्याना सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक राजेश नेहते यांनी केले.
तरुणांना उद्योजक बनण्याचे सल्ला देत नोकरी करण्यापेक्षा नोकरी देणारे बना असे आवाहन महापौर जयश्री महाजन यांनी केले. प्रवीण नायसे यांनी स्पर्धा परीक्षा तयारी करताना घ्यावयाची काळजी, अभ्यास कसा करावा, स्पर्धा प्रत्येक क्षेत्रात आहे. आपले कौशल्य पणाला लावून राष्ट्र हितासाठी काम करण्याची संधी स्पर्धा परीक्षाच्या माध्यमातून मिळते. त्यांनी यूपीएससी, एमपीएससी बद्दल माहिती दिली.
स्वाती शहा यांनी मार्गदर्शन करतांना जर आपल्याला उद्योगात उतरायचे असेल तर काय करायचे आहे ते आधी ठरवायचे ,काही तरी करायचे तर काय करायचे हे ठरविण्यात फार वेळ जातो म्हणून आधी ठरावा काय करायचे आहे. स्वतः चे स्किल ओळखा आणि व्यवसाय करा .यासोबतच शासकीय योजनांची माहिती दिली.
राकीब अहमद यांनी कौशल्य विकास वर मार्गदर्शन करतांना जीवन जगण्यासाठी चे कौशल्य यावर मार्गदर्शन केले. त्यात गरजा आणि इच्छा यातील भेद करायला शिका यावर विशेष मार्गदर्शन केले.
सागर धनाड यांनी यांनी शेतीपूरक व्यवसायावर मार्गदर्शन करतांना शेतीसाठी विविध शासकीय योजनांची माहिती दिली. सूत्रसंचालन लीना लोखंडे, धर्मराज देवकर यांनी केले. यशस्वीतेसाठी तेजोदिप नावावीचार फाउंडेशन च्या सदस्यांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमात सहभागी झालेल्या व्यक्ती साठी लकीड्रॉ काढण्यात आला. त्यात ऑफिस बॅग राज प्रकाश पाटील व राजेंद्र पाटील यांना मिळाले.तर पैठणी शुभम खर्चे व योगिता भिरुड यांना मिळाली.
यांना करण्यात आले सन्मानित : – विजय भारंबे चितोडे शेती,फाल्गुन किरण महाजन क्रीडा, खेमचंद मोहन पाटील क्रीडा, राज प्रकाश पाटील, डॉ. सागर कुरकुरे, डॉ. काजल पाटील, युवराज वारके ,पुणे , महेंद्र पाटील सुरत , डॉ. प्रवीण पाचपांडे, मुक्ताईनगर, डॉ. सचिन कोलते भुसावळ, रितेश वारके पुणे , हश्लेषा चौधरी, ,बदलापूर, पुष्पा वारके , भुसावळ, रेखा पाटील ,गाडेगाव, भूषण वराडे , भुसावळ, निलेश वाणी, भुसावळ, पंकज नाले ,जळगाव, तुषार धांडे, चितोडे,
https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/457445136131161