पाचोरा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । पाचोरा – भडगाव युवक काँग्रेस यांच्या वतीने आज पाचोरा येथील स्टेट बँकेचे मुख्य शाखेसमोर तीव्र निदर्शने करण्यात आली हिडनबर्ग अहवाल आल्यानंतर अदानी ग्रुपच्या कंपनीने केलेल्या आर्थिक गैरव्यवहार करून स्टेट बँक ऑफ इंडिया, एल.आय.सी. आॅफ इंडिया, पंजाब नॅशनल बँक या संस्थांचे लाखो करोड रुपये बुडवण्याचे षडयंत्र केंद्र सरकारच्या केंद्र सरकारच्या माध्यमातून केल्याने शेअर मार्केटच्या निमित्ताने बाहेर आले आहे अशा वेळी मोदी सरकार कारवाई करण्याऐवजी चूप बसले आहे. अदानी समूह स्टेट बँक ऑफ इंडिया, एल. आय.सी. आॅफ इंडिया या प्रशासनाची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करावी या मागणीसाठी युवक काँग्रेसच्या वतीने तीव्र निदर्शने करण्यात आली.
स्टेट बँकेच्या मुख्य शाखेसमोर झालेल्या या निदर्शनात काँग्रेसचे माजी जिल्हा उपाध्यक्ष अॅड. अविनाश भालेराव, पाचोरा – भडगाव युवक काँग्रेसचे अध्यक्ष शेख शकील शेख इब्राहिम, माजी नगरसेवक नंदकुमार सोनार, माजी उपनगराध्यक्ष मुक्तार शहा काँग्रेस शहराध्यक्ष अॅड. अमजद पठाण यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या निदर्शनात युवक काँग्रेस शहराध्यक्ष भरत बडगुजर तालुका अध्यक्ष रउफ काहकर, उपाध्यक्ष प्रशांत मालखेडे, कपिल पाटील, विशाल देवकर, तोफिक शेख, शेवाज बागवान, रफिक शेख, आवेश पिंजारी, रईस खान, ईश्वर डोंगरे, आबिद शेख, अखिल कहाकर, अकील कहाकर, अविनाश पवार, फारुक शेख आधी युवक काँग्रेस व काँग्रेसचे पदाधिकारी मोठ्या संख्येने हजर होते यावेळी मोदी सरकार अदानी समूह यांच्या विरोधात घोषणांनी परिसर दणाणून सोडला होता.