पुणे-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | बारावी परिक्षेचा निकाल हा उद्या अर्थात २५ मे रोजी लागणार आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल उद्या जाहीर करण्यात येणार आहे. दुपारी दोन वाजता बारावीचा निकाल विद्यार्थ्यांना ऑनलाईन पाहता येणार आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या संकेतस्थळांवर जाहीर होणार आहे.
या संकेतस्थळांवर निकाल पाहता येणार
mahresult.nic.in
https://hsc.mahresults.org.in
http://hscresult.mkcl.org
फेब्रुवारी-मार्च महिन्यात दहावी-बारावीची परीक्षा पार पडली होती. परीक्षेनंतर शिक्षकांनी मुदतीत उत्तरपत्रिकांची तपासणी केली आहे. त्यामुळे उद्या म्हणजे २५ मे दुपारी दोन वाजता निकाल जाहीर होणार आहे. निकाल जाहीर झाल्यानंतर 26 मे पासून 5 जून पर्यंत विद्यार्थ्यांना गुण पडताळणीसाठी संकेतस्थळावर अर्ज करता येईल. तर गुणपत्रिका 5 जून रोजी महाविद्यालयात मिळणार आहे.