Home Cities अमळनेर उद्या अमळनेरात ‘जय भीम’ चित्रपटाचे प्रदर्शन

उद्या अमळनेरात ‘जय भीम’ चित्रपटाचे प्रदर्शन

0
27


अमळनेर, प्रतिनिधी | भारतात सध्या आघाडीवर असलेल्या ‘जय भीम’ चित्रपट अमळनेरात उद्या रविवार दि. २१ नोव्हेंबरला छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात प्रदर्शित करण्यात येणार आहे.

 

छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात कोविड-१९ चे नियमांचे काटेकोरपणे पालन करून ‘जय भीम’ चित्रपट दाखविण्यात येणार आहे. हा चित्रपट दुपारी १२ ते ३ , दुपारी ३ ते ६ , सायंकाळी ६ ते ९ या वेळी प्रदर्शित करण्यात येणार आहे. हा चित्रपट पाहण्यासाठी जनतेने मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे. या कार्यक्रमाचे आयोजन समाधान मैराळे, सुरेश कांबळे संदीप सैंदाणे, प्रवीण बैसाणे यांनी केले आहे.


Protected Content

Play sound